(१) वारकऱ्यांचे वर्तन मला मान्य आहे असे मुळीच नाही. झुंडशाहीचा निषेध हा केलाच पाहिजे आणि मी तो करतो. मात्र, तौलनिक दृष्ट्या, भांडारकर संस्थेवर हल्ला करणाऱ्यांची झुंडशाही कितीतरी जास्ती निंदनीय आहे असेही मत नोंदतो.

(२) साहित्यिकांच्या रणधुमाळीत मला कुणाबद्दलही जास्त आपुलकी वा आकस नाही. या संमेलनाच्या भानगडीत पडणाऱ्या सगळ्यांचीच मला कीव वाटते. असलाच तर मला यादवांबद्दल सूक्ष्म आकस आहे असे म्हणता येऊ शकेल. 'झोंबी' वाचले नसते तर तो सूक्ष्मातून स्थूलाकडे सहज गेला असता.

(३) 'कलेसाठी कातडे' ही यादवांची कादंबरी. त्यात तात्या माडगूळकरांवर अतिशय हीन पातळीवरची टीका केली आहे.