धाप लागेपर्यंत जिने चढा. जेवढे मजले इमारतीला असतील तेवढे चडून मग उतरून पुन्हां चढायचें. सुरुवातीला जेमतेम ५-७ मजले चढाल. अस्ते आस्ते वाढत जातील. कांहीं आठवड्यांत तुम्हीं पुन्हा फिट व्हाल. शंभरेक जमतील.

माझ्या मतें तुम्हांला पूर्वतयारी करायला, बॉडी कंडिशनमध्यें आणायला वेळ मिळाला नाहीं. अहो वीस दिवस गाडी बंद असेल तर स्टार्ट होत नाहीं. वीस वर्षांनंतर शरीर पूर्वतयारी केल्याशिवाय कसें साथ देईल?

खरेंच निर्धार करा आणि खरेंच डिसेंबर २००९ मध्यें तुम्हीं यशस्वी गिर्यारोहण करा. इच्छा आहे तेथें मार्ग आहे. माझ्यातर्फे शुभेच्छा.

करणार प्रयत्न? प्रॉमिस?

सुधीर कांदळकर.