"माझ्याकडे पुरावे आहेत" असे म्हणत तुकाराम महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे, प्रकरण अंगाशी येताच संमेलनाचे अध्यक्षपद सांभाळण्यासाठी (स्वतःच्या मते सत्य असलेली) कादंबरीतील पाने काढून टाकणे, नंतर अगदीच नाड्या आवळल्या गेल्यावर अध्यक्षपदाचा राजीनामा देणे ह्या कोणत्याच गोष्टीचे समर्थन करता येणे शक्य नाही.

मात्र, तौलनिक दृष्ट्या, भांडारकर संस्थेवर हल्ला करणार्‍यांची झुंडशाही कितीतरी जास्ती निंदनीय आहे असेही मत नोंदतो.

सहमत. वारकऱ्यांनी पेपरात आलेला यादवांवरील तथाकथित हल्ला प्रकार वगळता कोठेही हिंसक किंवा जाळपोळीचे आंदोलन केले नाही असे वाटते.