प्रथमतः चौकस यांचे धन्यवाद! त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ह्या विषयाला हाताळत चर्चेस आणले.

साहित्यीकांपेक्षा तत्त्वचिंतकांना समाजात मान मिळायला हवा नव्हे तत्त्वचिंतकांनी तो मान आपणहून मिळवायला हवा. असे मला वाटते. संतसुर्य लिहीताना यादवांनी असे काय लिहीले? व त्याचा तात्त्विक वा एतिहासिक आधार काय? या बाबतचा पाठपुरावा समाजाने करायला हवा. 'नीति-नियम न समजवताच, समाजात सगळ्यांनी शहाण्या मुलांसारखे वागावे, बोलावे, लिहावे', अशी अपेक्षा ठेवणे समाजाच्या प्रगतीशीलपणाला अडथळा आणणारीच आहे.

ह्या जगात काही अध्यात्मिक नियम ही असतात. त्यांना सोप्या शब्दात व्यक्त करून समाजापूढे आणणे हे ही समाजाच्या हीताचेच असते. प्रत्येक बाबतीत प्रस्थापित शिष्टाचार पाळण्यावरच जोर देणं योग्य नाही. आणि म्हणूनच यादवांनी जे लिहीले त्याचा तात्त्विक वा एतिहासिक आधार त्यांच्या कडे मागितला जायला हवा. व त्यांनी ही तो द्यायला हवा. नुस्त 'सॉरी' म्हणून पिच्छा सोडवता येणार नाही.

 तसेच वारकऱ्यांना ही त्यांना एखादी गोष्ट का खटकली? त्याचे चर्चेद्वारे मुद्द्यासहीत स्पष्टीकरण त्यांना देता यायला हवे. नव्हे! ते त्यांच्या कडे मागितले जायला हवे. असे होण्यानेच या समस्येतून  काही नव्या गोष्टी प्रकाशात येवू शकतात.

आध्यात्मिक नियमांचं तत्त्वचिंतन न होताच, फक्त यादवांना वा वारकऱ्यांना दोष देणं ही गोष्ट समाजाला प्रगती साठी पोषक बाब नाही.