यादवांनी तुकारामांवर चिखलफेक केली असं का मानावं? संत तुकाराम हे जन्मापासून काही संत न्हवते. तरुण वयात तारुण्यसुलभ वर्तन घडले असण्याचा कल्पनाविष्कार यादवांनी दाखवला. मला तरी त्यात फारसे वावगे काही वाटत नाही. मी यादवांचे कुठलेच पुस्तक वाचलेले नाही, तरी एखाद्या प्रसंगाची गरज असल्यास तसे चित्र रंगवायला काय हरकत आहे? त्यांनी जंग जंग पछाडून तुकारामांचे चारित्र्य मलीन करायचा तर प्रयत्न नाही केलेला ना?