बरेच दिवस मनात असलेला विषय इथे चर्चेसाठी मांडल्याबद्दल, आणि तोही चौकस यांच्या अभ्यासू विश्लेषणाने वाचायला मिळाल्याने बरे वाटले.
मला काही शंका आहेत. संतसूर्य ही कादंबरी कुणी वाचली आहे का? आणि त्यात नक्की काय आक्षेपार्ह मजकूर आहे हे कळेल का?
दुसरे म्हनजे कवतीक राव ठाले पाटील ह्यांचे साहित्यीक कर्तृत्व काय? त्यांचे नावही इतके दिवस ऐकण्यात नव्हते. त्यांना कुणी केले अध्यक्ष?
साहित्य महामंडळावर कुणाची वर्णी लावायची हे कोण ठरवतो? त्या महामंडळाची घटना काय? आणि अभिजात साहित्याचा चाहते असलेल्या वाचकांचे यात स्थान काय? (यापेक्षा तर नाटक - सिनेमा वाली मंडळी मायबाप प्रेक्षक म्हणून आपल्याला अधिक मान देतात असे वाटू लागले आहे!)
राहता राहीला मुद्दा आनंद यादव यांच्या राजीनाम्याचा- तर तो एक सगळाच फार्स झाला. मुळात जर त्यांच्या कडे पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावेत अन्यथा संत तुकाराम यांच्या वर लिहीतांना तारतम्य बाळगण्याची अपेक्षा एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कडून करणे गैर वाजवी नाही!