संतसूर्य तुकाराम या कादंबरीत काय लिहिले होते ज्याला वारकऱ्यांचा आक्षेप होता हे मला अजूनही सापडलेले नाही. ते कोणी सांगेल का?

दुसरे म्हणजे धादांत खोटा प्रचार करणारी अनेकानेक पुस्तके प्रसिद्ध होत असतात, मग या कादंबरीवरून इतका गदारोळ का झाला? शिवाय एकदा कादंबरी असे नाव दिले म्हणजे त्यात काही भाग काल्पनिक असणार हे गृहित नाही का?

यादवांनी पुस्तक मागे घ्यायला नको होते असे मला वाटते. कारण त्यामुळे पुस्तकात नक्की काय होते हे स्वतः वाचून मते बनविण्याची संधी नाही.

बाकी संमेलनांविषयीच्या चौकस यांच्या मतांशी सहमत.