जो सन्मार्गावर असतो, त्याच्यावर परमेश्वरी क्रुपेचा वर्षाव सुरू होतो.
म्हणजे नक्की काय होते?
अधिकतर लोकांई विचारसरणी बिघडलेली असल्याने त्याची विषारी फळे सदप्रव्रुत्तांना भोगावी लागतात.\
सत्प्रवृत्त होऊनही इतरांच्या बिघडलेल्या विचारसरणीची (वाईट) फळेच मला भोगावी लागणार असतील तर सत्प्रवृत्त का व्हावे?
व्यवसाय-धंदा असो वा नोकरी-चाकरी, तुमच्यावर ठराविक जबाबदारी असते. ती जबाबदारी पार पाडण्यासाठीच मोबदला मिळत असतो. मोबदल्याचा हक्क तेव्हढा अबाधित ठेवून जबाबदारीपासून मात्र अंग चोरू नका, दूर पळू नका. तसे कराल तर तुम्ही विश्वासघाताचे पातक माथी घ्याल. आराम मिळविण्याचा तो खरा मार्ग नव्हे. अशा प्रव्रुत्तीतून नेहमी अधिक काळज्या निर्माण होतात. यासाठी आपल्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडावयास हवी.
हा खासा उपदेश मालकांनी आपल्या नोकरांसाठी केलेला दिसतो. पण नोकरांची पिळवणूक करू नका, वर्षानुवर्षे त्यांच्या घामाच्या पैशावर चैन केल्यावर एखाद्या वर्षी मंदी आली तर त्यांना नोकरीवरून कमी करून रस्त्यावर आणू नका असा काही उपदेश मालकांसाठी असता तर निदान लेखन समतोल आहे असे तरी म्हणता आले असते.
नसता ताप विकत घेण्यापेक्षा आमच्या हृदयात तीव्र इच्छा हवी ती 'उठता बसता कार्य करता'ना परमेश्वराचे स्मरण आणि चिंतन करीत समर्पण व्रुत्तीने आपले काम करण्याची.
बऱ्याच वर्षापूर्वी कम्युनिस्ट/समाजवादी लोक भगवद्गीतेचे "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" हे तत्त्वज्ञान मतलबी लोकांनी सामान्यांचे आर्थिक शोषण करण्यासाठी तयार केले आहे असे म्हणत. तेव्हा ते पटले नाही. पण व्यास/श्रीकृष्णांनी जरी या उद्देशाने केले नसले तरी त्याचा या पद्धतीने वापर मात्र नक्की झाला असावा/अजूनही होतो आहे यावर विश्वास बसायला लागला आहे.
जाता जाता - परमेश्वरी कृपा/मेल्यावर स्वर्गात अप्सरांची प्राप्ती यापेक्षा सद्गुणी असणे हेच सद्गुणी असण्याचे पारितोषिक आहे (वर्चू इज इटस ओन रिवॉर्ड) असे समजून सद्गुणी राहणे हे जास्त योग्य आणि पटणारे आहे असे वाटते.
विनायक