सखी यांना, दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. तिथे जे काही लिहिले आहे तेवढेच जर असेल ,तर मला तरी त्यांत आक्षेपार्ह काहीच वाटत नाही. कादंबरी लिहिताना एवढेही स्वातंत्र्य कुणी घ्यायचे नसेल तर त्याचा अर्थ, आपल्या देशात, सर्व ऐतिहासिक व्यक्ती वा महापुरुष हे कोणा ना कोणातरी झुंडीच्या मालकीचे झाले आहेत , असे खेदाने म्हणावे लागते.
कोणीही व्यक्ती ही एका रात्रीत संत कशी होईल? प्रत्येकाला तारुण्यसुलभ भावना असणारच की! आणि तशा त्या असल्या तर त्यांत वावगे काय? अशा षड्रिपुंना जिंकून घेऊन मगच कोणी महान संत होत असेल ना?
या गोष्टीचे राजकारण केले जात आहे . बरेच लोक , नक्की काय लिहिलेले आहे हे न वाचताच त्यावर रिऍक्ट होत आहेत.
उद्या , पुराणातल्या वाल्याचा वाल्मिकी झाला या वाक्यालाही लोक आक्षेप घेतील आणि तो जन्मतःच वाल्मिकी होता असे इतरांना म्हणायला लावतील..