रस्त्यावर टाळत असते अन घरी कधी भेटत नाही
स्वप्नी येउन हळूच म्हणते - तुजसारखा यार हवा

टेकडीवरी कुठल्या झाले प्रसन्न यांना देव म्हणे..
अरे खुळ्यांनो, प्रसन्न होण्या पर्वतही मंदार हवा

ध्यान लावुनी गुरू पहुडले हवेत काही फुटांवरी
टेकू देउन चेले म्हणती - गुरूसही आधार हवा
                                    ... व्वा, मस्तच !