सन्माननीय मृण्मयी,
अतिशय छान रचना आहे.
अभिनंदन!
नांदी वादळाची - या शेराला मी मीलनावर रचलेला शेर समजून पाहिले. तसा अर्थ तर फारच सुंदर होतो.
( विविध ओळींमध्ये आता विविध विषय तपासून बघण्याची एक खोड असते, पण मजा येते. )
जसे : - हा न गात्रांचा पुकार ही विनवणी काळजाची - यामध्ये प्रियकर शरीराने कदाचित प्रेयसीच्या साथीत असेलही पण मनाने नसेल असाही एक अर्थ निघतो. ( फक्त तो लांब आहे आणि प्रेयसीला शारिरिक ओढ नसून मानसिक आहे असेच नाही. तो तिथेच आहे पण मनाने बरोबर नाही अशीही एक छटा! )