नव्या वर्षापासून स्त्री भ्रूण हत्या होऊ नयेत अशी संपूर्ण समाजाला दिलेली शुभेच्छा हे माझ्या शुभेच्छेचे स्वरूप उज्ज्वला ताईंनी स्पष्ट केले त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद.
यात मनोगतींना उपदेश करण्याचा / आरोप करण्याचा जराही मानस नव्हता, असूच शकत नाही. ही शुभेच्छा टग्या यांना प्रयोजनविरहित वाटत असेल तर वाटो बापडी. मी आपलं समाजाच्या समस्या कमी होवोत, आटोक्यात येवोत अशा निर्मळ हेतूने शुभचिंतन केलं इतकंच.
पुन्हा एकदा सर्वांनाच नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
जाता जाता सहज आठवलं - या वर्षाचं नाव "विरोधि" असं आहे.
(बघा ना, नुसत्या या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तर किती विरोध! ह. घ्या.) असो.
या वर्षात समाजातल्या अनिष्टाचे आपण सर्व विरोधी आहोत हे कृतिशीलपणे सिद्ध करूया. ही आणखी एक शुभेच्छा!