तुमची लेखनशैली फार छान आहे. ओघवती आहे. लेख कधी वाचून संपला कळलंच नाही. लेख खूप आवडला फक्त तुम्ही घेतलेला पुढे न जाण्याचा निर्णय वाचून जरा दुःख झालं.
तुमचा लेख वाचताना मला एक कल्पना सुचली आहे. एक मनोगत दुर्गभ्रमण सहल काढायची. सर्व वयोगटातील मनोगतींसाठी आधी पर्वतीपासून सुरुवात करून सोपे ते अवघड असा प्रवास करत पार रायगडापर्यंत सहलींची एक साखळी आयोजित करायची. एका महिन्यात एक सहल. आणि कात्रज सिंहगड मूनलाईट ट्रेकने सांगता करायची.
येणार का सहलीला?
स्वयंसेवक म्हणून मी माझं नाव सर्वप्रथम नोंदवते!
--अदिती