प्रश्न योग्य आहे. उर्जेची बचत करण्यासाठी अर्थ अवर पाळणे योग्यच. शिवाय यातून याबद्दलची जाणीवही वाढीस लागावी. पण दुसरे टोक भारतासारखे विकसनशील देश आहेत. आपल्या कित्येक गावांमध्ये मुळात वीजच नाही तिथे बचत काय कपाळ करणार? गावांचे सोडा, पुणे-मुंबईसारख्या आधुनिक शहरांमध्येही सलग वीजपुरवठा दिवास्वप्नच आहे.
हे म्हणजे राजाला आपल्या श्रीमंतीची जाणीव झाली आणि त्याने एकदा भाकरी-चटणी खायची ठरवली. पण जे गरिब लोक नेहेमीच भाकरी-चटणी खातात त्यांना याचे काय अप्रूप?
याचा अर्थ विजेची नासाडी करा असा अजिबात नव्हे. आपल्या मूलभूत सोई सुधारायला हव्यात असा आहे.
हॅम्लेट