कळू शकेल. त्याच ओळीचा काय, सगळ्या गझलेचाच अर्थ कळू शकेल. पण आपल्याला त्याच शेराचा अर्थ हवा आहे म्हणून देत आहे.
जो जो प्रवेशला तो गालीब होत गेला
टाकेल पाय जेथे तो आगरा निघाला
( महान शायर असद उल्ला खाँ गालिबचे जन्मस्थान आग्रा होते हे आपल्याला माहीत असेल असे गृहीत धरून लिहीत आहे. )
अर्थ १ - या जगात वावरणारा प्रत्येक माणूस असा वावरतो जणू की ( जर हे जग म्हणजे एक मुशायरा असेल तर ) तो गालीबच आहे अन तो जिथे पाय टाकेल तेथे अशी जमीन निर्माण होईल जिथे आणखीन 'गालीब' निपजतील.
अर्थ २ - वागताना माणसे अशी वागली जणू ती ( जगाच्या मुशायऱ्यातील ) गालीबच आहेत. पण भ्रमाचा भोपळा फुटला. जिथे जिथे ती गेली ते गालीब सारख्या महान शायराचे जन्मस्थान होते. तिथे त्यांना एक गालीब भेटला. जो त्यांच्यापेक्षा अनेक पटींनी सरस होता.
अर्थ ३ - हे जग किती सुंदर अन काव्यमय आहे! इथे जो जन्माला आला तो या जगातील मुशायऱ्यामधील जणू गालीबच होता. इतकी सुंदर माणसे! अन शायरीने भारलेले वातावरण असायचे अशा आग्रा ( खरे तर दिल्ली महत्त्वाची ) शहरासारखे सारे जग आहे.
अर्थ ४ - ज्यांना कळायला पाहिजे त्यांना कळला असेल!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!