ग्लोबल वॉर्मिंग चा वीजेच्या वापराशी काय संबंध आहे हे मला कळले नाही. वीज ही अनेक उर्जास्त्रोत्रांपैकी एक आहे. पेट्रोल, डिजेल ह्यांच्या अति वापरामुळे (तेही पाश्च्यात्यांच्या) ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या (त्यांनीच शोधून काढल्यामुळे) उभी राहत आहे. सौर उर्जेवर वा वीजेवर रीचार्ज करणाऱ्या गाड्या साधने ही पाश्चात्य मंडळी शोधून काढून त्याचा प्रसार करत नाहीत हे ही त्यामागचे कारण आहे.   अमेरीका व आखाती देशांना अतिश्रीमंत करण्यात ह्या तेलाचा मोठा वाटा आहे. अन्नधान्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत कमी मात्र पेट्रोल, डिजेल साठी जास्त किंमत! ह्या मुळेच कष्ट करून धान्य उत्पादन करणाऱे देश गरीब मात्र तेल विकणारे श्रीमंत!

अमेरीका स्वतः किती उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करते. त्या प्रक्षेपणां मुळे पृथ्वीच्या हवेच्या आवरणाला छिद्रे होत नाहीत का?

आणि म्हणूनच ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना मला एक खूळ वाटते.