इथे-अमेरिकेत मी रुमाल वापरीत नाही. कागदाची(टिशू) दुनिया आहे ही. काही विसविशीत तर काही घट्ट.

हो खरंय... अगदी!

ह्या कागदांना ओलावा, समजूतदारपणा नाही. आहे तो व्यावहारीक  तटस्थ कोरडेपणा...

तुमच्या स्थानिक सुप्परमार्किटात जिथे ते कोरडे टिशू ठेवलेले असतात ना, तिथेच जवळपास नीट बघितलंत तर मॉइस्ट वाइप्स (ओले टिशू) सुद्धा मिळतील. 'वेट वन्स' ब्राण्डचा डबा असतो, नाहीतर 'क्लीनेक्स' ब्राण्डचं पाकीट असतं. मी वापरतो कधीकधी.

अमेरिकेतच कशाला, भारतातसुद्धा मिळतात ओले टिशू. आणि हल्लीच नाही, बऱ्याच वर्षांपासून.