याच खेळाचं नाव आठवण्याचा बऱ्याच म्हणजे बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होतो! काही केल्या आठवत नव्हतं! (सारखं 'रुमालपास' डोक्यात येत होतं - 'टाईमपास'सारखं! - आणि काहीतरी चुकतंय हे जाणवत होतं, पण नक्की बरोबर काय तेही लक्षात येत नव्हतं! )
ते रुमालाला गाठ मारून एकमेकांकडे फेकायचं आणि दुसऱ्या पार्टीनं रुमाल धरलेल्याला पकडायचं असंच कायसंसं होतं ना?
जुन्या आठवणी ताज्या करून दिल्याबद्दल आभारी आहे!