गझलेचा मूड वाचतानाच जाणवला होता ; कवीने आपणहून अर्थ समजावल्यामुळे अर्थाचे शेवटचे थेंबही मिळाल्याचे समाधान आहे !

गझल खूप आवडली. जगाबद्दल . माणसांबद्दलची (अबाउट मेन अँड मॅटर्स) मार्मिक नीरीक्षणे तितक्याच ताकदीने मांडल्यासारखे वाटले. गझलेचे व्याकरण मला बिलकुल कळत नाही ; मात्र वाचताना शब्दांचा डौल ढळल्यासारखे कुठे वाटले नाही. फारच सुरेख गझल.