... मी नाही केला, पण आमच्या वर्गातली मुलं करायची खरी. (आमची फक्त मुलांची शाळा होती. )

आमच्या वर्गातली मुलं रुमालाचं आणखीही बरंच काहीकाही करायची, पण त्याची वाच्यता मी इथे करणं बरं दिसणार नाही.

(तात्पर्यः ओरी-गामीसारखीच ओरी-रुमालाला-जपानीत-जे-काही-म्हणत-असतील-ते* हीसुद्धा एक मोठी कला आहे. )

*जपानीत 'ओरिगामी' म्हणजे कागदाची घडी करणं. 'ओरी' (मूळ धातू 'ओरु') म्हणजे दुमडणं, घडी करणं. 'कामी' म्हणजे कागद. (संधी होताना 'कामी'चा 'गामी' होतो. ) जपानीत रुमालाला 'हानकाची' की कायसंसं म्हणतात म्हणे - 'हँडकरचीफ'चा अपभ्रंश! अधिक माहिती इथे.