दोन हातात रुमालाची दोन टोके पकडून, कोणत्याही हातातून रुमाल एकदाही न सोडता रुमालाला गाठ बांधून दाखवा. (हे शक्य आहे काय? )
(उत्तर - सापडल्यास! - येथेच द्यावे. अथवा हे शक्य नाही असे वाटत असल्यास तसेही - शक्यतो कारणांसह - येथेच मांडावे. कृपया कोणत्याही परिस्थितीत व्यक्तिगत निरोप पाठवू नयेत; पाठवल्यास न वाचता कचऱ्याच्या पेटीमार्फत निरोपाची विल्हेवाट लावली जाईल याची कृपया नोंद घ्यावी.)
(पुरेसे प्रतिसाद आल्यास उत्तर - शक्याशक्यतेसह - जमेल तसे पुढील आठवड्यात कधीतरी.)