लेख हलका फुलका सुंदर झाला आहे. मला यापूर्वीच्या तुमच्या लेखनापेक्षा जास्त सहज सोपा, ओघवता वाटला. टग्याची प्रतिसादांची सरबत्तीही झकास झाली आहे. त्याने लेखाला आणखीच खुमारी आलीये.

असो. दोन हातात रुमालाची दोन टोके पकडून, कोणत्याही हातातून रुमाल एकदाही न सोडता रुमालाला गाठ बांधून दाखवा. (हे शक्य आहे काय? )

मला जमलं. पण पहिल्या प्रयत्नात ती गाठ माझ्या हाताभोवती बांधली गेली. नंतर अधिक प्रयत्न केल्यावर नुसती गाठही बसली.

१. एकाच रुमालाची दोन टोकं दोन हातांत धरली.

२. उजव्या हातातील टोक डाव्या हातातील टोकाजवळ आणले.

३. डाव्या हाताच्या मनगटाखालून पण डाव्या हातातील रुमालाच्या टोकावरून उजव्या हातातील रुमालाच्या टोकाने अढी घातली.

४. उजव्या हातातील टोक उजव्या हाताने डाव्या बाजूस आणि डाव्या हातातील टोक डाव्या हाताने उजव्या बाजूस ओढले.

झालं बसली गाठ!