आहे "गद्यं कवीनां निकषं वदन्ति" अशी. अर्थ असा की चांगल्या कवित्वाचा (म्हणजे बुद्धिमत्तेचा / वाङ्मयरचनेचा ) निकष म्हणजे गद्यरचना.

तत्कालीन समजूत अशी होती की पद्यरचना करणाऱ्या कवीला छंद, वृत्त, बंध, अलंकार अशा गोष्टींचं नैसर्गिक, सहज पाठबळ असतं. त्यामुळे ती रचना करणं हे तुलनेनं सोपं असतं. शिवाय छंदोबद्ध पद्याला गेयता असते, लय ताल असतात त्यामुळे रसिकांचं लक्ष वेधून घेऊन खिळवून ठेवणं, दाद मिळवणं हेही सोपं असतं. अर्थातच पद्यरचना मोठ्या प्रमाणात होत होती.

गद्य मुख्यतः जडजंबाळ शास्त्रीय ग्रंथांतच दिसायचं.

गद्याच्या बाबतीत अलंकार वगळता कोणत्याच गोष्टीचं साह्य नाही. त्यामुळे दर्जेदार गद्य निर्मिती हे सर्व कवींच्या (बुद्धिमंतांच्या, साहित्यिकांच्या) बुद्धीला मोठे आव्हान मानले जात होते. गद्याला गेयता वगैरे नसल्याने श्रोत्याचे लक्ष वेधणे, खिळवून ठेवणे हे मुख्यतः त्या कवीच्या प्रतिभेलाच आव्हान होते.

असं सगळं असल्याने "गद्यं कवीनां निकषं वदन्ति" हे तत्कालीन साहित्यशास्त्राचं महत्त्वाचं गृहीतक होतं. त्याचा आधार मी घेतला आणि दर्जेदार गद्य कमीच दिसणार अशी एक उगाच मखलाशी केली इतकंच!