"अर्थ अवर" सारखे खुळ (? ) एसीत बसून काम करणाऱ्यांनाच सुचतात हे खरं का खोटं हो?

हाताने सहज करता येणारी कामं विजेवर चालणाऱ्या यंत्रानेच व्हाही असा ह्यांचा अट्टहास आणि मग "अर्थ अवर" पाळून इतरांना त्रास द्यायचा ? कमाल आहे बुआ. हे म्हणजे दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान ... असेच तर नाही ना ?

स्वयंचलित दरवाजे (आजकाल मॉलमध्ये भारतात येवू लागलेत), हात कोरडे करण्याचे यंत्र (रुमाल वापरा की), डीश वॉशर, दिवसाउजेडी दिवे लावावे लागतात अश्या बांधलेल्या इमारती (याला हायटेक म्हणतात म्हणे)..... वगैरे ...........

आधी स्वत: करा मग इतरांना सांगा, हेच एक भारतीय म्हणून अमेरिकन (आणि इतर, जे अमेरिकेन संस्कृती (? ) चा गोडवा गाणारे राष्ट्र) लोकांना म्हणीन.