तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण... संपूर्ण मराठी कार्यक्रमामध्ये ते क्या बात है हे मीठाच्या खड्या सारखं लागत होतं. प्रश्न असा आहे की, जसं इंग्लिश मध्ये इश्श्य नाही म्हणून इंग्लिश बायका लाजत नाहीत असा अर्थ होतो का? तसेच मराठी मध्ये उस्फुर्त दाद देण्यासाठी शब्द संपदा कमी आहे, म्हणून मराठी लोकांना दाद देण्याची माहिती नाही असा निष्कर्ष काढावा का...

आणि मुख्य मुद्दा विचारासाठी असा आणायचा होता की मराठी मध्ये दाद देण्यासाठी नवीन वाक् प्रचार 'निर्माण' व्हावेत... हे चाबूक वगैरे मुख्य धारेमध्ये (main stream) येणारे शब्द नाहीत ना...