आपण विषय  छान निवडलात. राजकारणातील घराणेशाही म्हणजे  भारतात  पुर्वी  चालू असणार्या  बलुतेशाहीचे नवे  रुप होय.

पुर्वी आपल्याकडचे  कारागिर लोक आपल्या मुलांना जास्त कष्ट  घ्यावे लागू नयेत म्हणून त्याला आपले कसब शिकवित असत.

व त्याला मदतही  करत असत. त्यामुळे त्यांचा धंदा उत्तम चाले. शिवाय  बापाच्या अनुभवाचा फायदा मुलांना मिळून त्यांना

जास्त  मेहनत घ्यावी लागत नसे .शिवाय  बापाचा एकफायदा असा की पोरगा कायम त्याच्या मुठीत राही.  आजच्या राजकारणाचे

तसेच जाले आहे. पुर्वी लोकांना त्या कारागिराच्याच कडे  जावे लागे कारण दुसरा  माणूस उपलब्ध नसे. सध्या आपलेही तसेच आहे.

आपल्याला योग्य माणूस मिळत नाही. किंवा आपल्यात बदल घडवून  आणण्याची  इच्छा  नाही. त्यामुळे आपल्याला ह्या नव्या

बलुतेदारांच्यापुढे गुडघे टेकावे लागत आहेत. विजय देश्मुखांनी म्हणल्याप्रमाणे  आपण मूर्खच आहोत. आपल्याला मूर्ख बनून घ्यायची

सवय लागलेली  आहे.