सन्माननीय ऋचाजी,

माझे वैयक्तिक मत असे आहे की रचनेचे विडंबन करणे ठीक आहे पण नावाचेही केले आहे.

रचनेच्या विडंबनामागील एक नवीनच हेतू मला मनोगतावर मिळाला. तो म्हणजे रचनेची खिल्ली उडवणे. मला असे वाटायचे की एखाद्या रचनेच्या विडंबनातून काहीतरी सामाजिक संदेश पाठवणे म्हणजे विडंबन! ( या विडंबनात पाठवलेला संदेश हा आहे की मूळ कवितेचा कवी तद्दन फालतू रचना करतो. )

नावाचे विडंबन करण्यातील हेतू बहुधा असा असावा की त्या माणसाचीही खिल्ली उडवणे!   याचमुळे मी तो माझा गौरव समजत नाही.

( अवांतर - अशा प्रसंगांमुळे मला नवीन कवितेचे विषय आपोआप मिळतात. लवकरच मी एक कविता प्रकाशित करत आहे, अशा स्फुर्तीमुळे सुचलेली. )