माझ्या आजोबांनी आणि त्यांच्या मित्रांनी रोज वेगवेगळ्या मंदिरांना जायचा संकल्प केला होता. तसे ते चार महिने फिरत होते. म्हणजे चार महिन्यांनी ते पहिल्या मंदिरावर आले. मला माहित आसलेली आणि आजोबांच्या संकल्पाच्या निमित्ताने आजीने संगितलेली अजून काही वेगळी नावे...चर्चा खुप जुनी आहे पण मला थोडी भर घालावीशी वाटली म्हणून......
मारुती-
भांग्या मारुती, उंटाडे मारुती, अकरा मारुती, सोन्या मारुती, दक्षिणमुखी मारुती, वीर मारुती, शिंदे पार मारुती, शकुनी मारुती, बटाट्या मारुती, गावकोस मारुती.
गणपती-
उंबऱ्या गणपती, त्रिशुंड्या गणपती, गरूड गणपती, गुपचुप गणपती, कसबा गणपती, जुन्या जाईचा गणपती इ.
विठोबा-
प्रेमळ विठोबा, झांजले विठोबा, शेडगे विठोबा, निवडुंग्या विठोबा.
दत्त-
दाढीवाला दत्त, दगडूशेठ दत्त मंदिर (दगडूशेठचे आधी दत्त मंदिरच होते. गणपती नंतर प्रसिद्धी पावला.)
सध्या एव्हढेच आठवलेत. अजून आठवले/सापडले की/तर देईनच.