राजकारणात,घराणेशाही का चालवून घेतली जाते वा त्याची जरुर कशी असते यावर राजकारणातल्याच  एका माहितगार व्यक्तिने दिलेली माहिती अशी :-
आपल्या हयातीत ,राजकारणी नेत्याने जी प्रचंड संपत्ती जमवलेली असते, ती सगळी त्याच्या मालकीची नसून बराचसा भाग पक्षाच्या नावावर मिळवलेला असतो. अशा वेळी ही व्यक्ती अचानक दगावली तर त्या गुप्त संपत्तीचा ठावठिकाणा फक्त घरातल्यांनाच माहित असतो. म्हणून पक्षाला त्याच्या वारसदाराला तिकीट द्यावेच लागते. त्यांत पात्रतेचा संबंध नसतोच. शिवाय लोकांची सहानुभूती तर मिळते! पण , काही नेत्यांना तेवढाही धीर वा विश्वास नसतो. (पक्षावर). म्हणून ते आपल्या हयातीतच आपला वारसदार तयार करतात.
मुख्य उद्देश, अर्थातच आपण जमवलेला पैसा बाहेर जाऊ नये हाच असतो. त्यामुळेच तर कायम घराणेशाहीच्या नावाने शिमगा करणारे स्वतः घराणेशाहीच राबवतात.  
थोडक्यात काय, हे सर्व भारतभूमीचे सुपुत्र(? ) सामान्य माणसांना फसवून, झुलवून स्वतः मजेत, चैनीत आणि मस्तीत राहतात आणि त्यातील काही तर पंतप्रधान होण्याची स्वप्ने बघतात, एवढेच नव्हे तर त्यावर चर्चा घडवून आणतात!

जय हो!!!