विडंबन एंजॉय करणारा मी स्वतः पहिला होतो हे आपल्याला माझ्या प्रतिसादावरून मान्य व्हावे.

आता काही प्रतिसादांचा क्रम पहाः

( गंमत म्हणजे केतन यांनी तसा उल्लेख करेपर्यंत मला तसे वाटलेही नव्हते. )

ऋचाजी - निळा रंग अन रचनाकाल

केतनसाहेब - निळा रंग अन रचनाकाल हे अनुकरण आहे.

आपण - "आम्ही ओळखले बर का? "

आता एवढे वाचल्यावर मला माझ्याच बुद्धीची  शंका यायला लागली. 

असो. प्रदीप कुलकर्णी कशी व्यक्ती आहे हे मला माहीत आहे. मी आधीच म्हंटलेले आहे की असल्या गोष्टी ते करणार नाहीत.

उलट 'गझलकारांनी' गोष्टी कशा कराव्यात हे जाणण्यासाठी त्यांच्याशी केलेले संभाषण उपयुक्त ठरू शकते.

( अवांतर - माणूस कधीच बदलत नाही असेही गृहीत धरण्यात अर्थ नाही. फार फार पुर्वी एका अत्यंत सभ्य गजलकाराने दुसऱ्या एका गझलकाराला 'मार पाहिजे काय? ' असे संकेतस्थळावर जाहीर विचारलेल्या प्रसंगाला मी स्वतः साक्षीदार आहे. प्रशासकांना एकंदर प्रसंगातून साईटची 'प्रतिमा' खराब होऊ शकेल असा रास्त संदेह निर्माण झाल्याने त्यांनी 'मार' या शब्दाला बदलून 'ऐवज' असा शब्द स्वतःच टाकला. )