भूषण कटककर, दोन-तीन सदस्यनामे घ्यायची. पहिल्या नावाने गंभीरपणे लेखन करायचे. आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या नावाने स्वतःचीच खिल्ली उडवायची असे प्रकारही आम्ही तुम्ही म्हणता त्याच संकेतस्थळावर बघितले आहेत. त्यामुळे काही सांगता येत नाही. असो. कुणाचीही बाजू न घेता एवढेच म्हणेन की, हा जो काही प्रकार होतो आहे तो अत्यंत खोडसाळ असा प्रकार  आहे. (खोडसाळ ह्या सदस्याशी कृपया संबंध जोडून पाहू नये).

प्रशासक योग्य वाटते तिथे आपला बडगा चालवतीलच पण सध्या जे  अंधारात तीर सोडण्याचे  प्रकार चालले आहेत, ते बंद व्हायला हवेत. तसेच 'भीषण टलाटकर' असे नाव घेण्यामुळे मनोगतावर नवा पायंडा सुरू होता कामा नये. बाकी विडंबन एकंदर छान.