( रचनाकाल इतका आधीचा? )
रचनाकाल इतका आधीचाच आहे. मूळ कवितेत आणखी तीन कडवी होती. पण ती रचली तेव्हा फारच बाळबोध वाटली. म्हणून कविता कुठे लिहूनही ठेवली नव्हती. एम्. ए. ला असताना कादंबरी (संस्कृत) मधलं पत्रलेखावर्णन शिकताना(संक्रांतीच्या आसपासची) ही रचना आहे. पत्रलेखा-चंद्रापीड यांच्यातल्या नात्यावरून हे बीज सुचलं.
परवा सुपरव्हिजन करताना नीरव शांततेत अचानक आठवली ----तुटक तुटक.
तिची सांधेजोड केली आणि मनोगतावर दिली.
( तसेचः रचनाकाल देण्यातला हेतू काय असतो? )
हेतू काय असायचाय त्यात?
पूर्वी आपण कसे लिहीत होतो आणि आता कसे लिहितोय यात तुलना करायला मजा वाटते--- नोस्टॅल्जिक वाटतं---बरं वाटतं---इतकंच!