भाषांतर तितकेसे नाही पटले.
प्रीतिचा प्रस्ताव मी - हा तुझा स्वीकारते: 'फ़ैसला' = 'प्रस्ताव'?????? 'निर्णय' अशी माझी समजूत होती.
मी असे तुज आसरा - आसरा अन् तू मला: 'मन्ज़िल' = 'गंतव्यस्थान' अशी माझी समजूत होती. (इमारतीचा) 'मजला', (प्रवासाचा) 'टप्पा' असेही अर्थ माहीत होते. आता जालावरील प्लाट्सच्या उर्दू शब्दकोशात पाहिले असता या सर्व अर्थांबरोबर 'उतरण्याची जागा' (जसे हॉटेल, धर्मशाळा वगैरे) अशाही प्रकारचा एक अर्थ सापडला, ज्याचा दूरान्वयाने 'आसरा'शी संबंध लागतो, पण हा अर्थ मूळ गाण्यात अभिप्रेत नसावा असे (उर्दूच्या गंधाअभावी केवळ कॉमनसेन्सने) मला तरी वाटते. त्यापेक्षा 'गंतव्यस्थान' ('ध्येय' अशा अर्थी) असा अर्थ निदान माझ्या मनाला तरी पटतो.
(अर्थात तज्ज्ञांची मते याहून वेगळी असू शकतील याची नम्र जाणीव आहेच.)