टगवंतराव,
इतके मनापासून अभ्यासपूर्वक शंका विचारल्याबद्दल सर्वप्रथम आभार,

= 'प्रस्ताव'?????? 'निर्णय' अशी माझी समजूत होती.

तुमची समजूत बरोबर आहे. त्याचा अर्थ निर्णय असाच होतो. पण प्रसंग काय आहे पाहा की राव. नायकाचा निणय आपापला झालेला आहे आणि त्याने नायिकेला प्रेम व्यक्त केलेले आहे, आणि तिचे प्रेम मागितलेले आहे. (कदाचित. मी सिनेमा बघितलेला नाही. ) त्यामुळे तो प्रस्ताव तिने स्वीकारला असा अर्थ घेणे बरे वाटले. शिवाय खाली पाठभेदात 'निर्णय' असा अर्थ घेऊनही भाषांतर दिलेले आहे ते पाहा.) १ नंबरची तळटीप बघा.)

= 'गंतव्यस्थान' अशी माझी समजूत होती.

ही समजूत पण बरोबर आहे. पण ध्येय कशासाठी? तर प्रिय व्यक्तीच्या प्राप्तीचे ध्येय का प्रिय व्यक्तीच्या प्रेमात समर्पणाचे ध्येय? ह्या पैकी नायिकेला नायकाच्या प्रेमाचा आधार हवा आहे त्यात तिला आसरा दिसतो असा ध्येय असा अर्थ मीघेतला. हवे असलेले प्रेम असा अर्थ घेतला तर

मी तुला आहे हवी - मज हवा आहेस तू
वादळाला का भिऊ - तीर मज आहेस तू

असे भाषांतर केले तर ते गंतव्यस्थानाच्या जवळ जाईल असे वाटते. इथे गंतव्यस्थानापाशीच दोघे राहणार असा अर्थ घेतला आहे गंतव्य स्थानापाशी ष्टोरी संपली असे असेल तर

मी तुला होते हवी - मज हवा होतास तू
वादळाला का भिऊ - तीर मज आहेस तू

असे करावे   गंतव्यस्थान अशा अर्थांने तुम्हाला काही ओळी स्फुरल्या तर त्याही लिहा येथे.

(प्रशासक, प्लीज पाठभेदात टाकणार का? टगवंतरावांचा श्रेय निर्देशही करावा. )

अवांतर.

मी हा शब्द पूर्वी पायरी असा अर्थ घेऊनही वापरला आहे.

दर वळणावरी जीवनाच्या
गात गाणे पहा मी निघालो
भान माझे कुठे काय सांगू
पायऱ्यांशी न रमता निघालो ।१।

ही कोण स्वप्नात दिसली ...

(थोडक्यात काय काही प्रमाणात स्वातंत्र्य घ्यावे लागते. )