समुद्र आहे अतिसहवासाने विझलेल्या प्रेमासारखा शांत.

हे वाक्य (की ओळ? ) खूप आवडले.

आधीचे - निळसर स्वप्नं, काळ्या वासना, हिरव्या प्रतारणा,  पिवळे दु:ख आणि लाल वेदना .... आणि नंतरचे - सहावा रंग म्हणून नाही.

हे वाचताना अंकगणितात घातलेले गणित पुन्हा पुन्हा वाचावे लागते तेव्हा आधी दिलेली नंतर दिलेली माहिती कळू लागते त्याची आठवण झाली !

वेगळीच आहे तुमची शैली. (प्रज्ञा आणि प्रतिभा ह्या दोन्हीच्या मध्ये कोठेतरी हे येत असावे! ) मला आधी रस वाटत नव्हता मात्र ह्या कवितेमुळे वाटू लागला आहे.

आणखी वाचायला आवडेल.