हे कोणत्या कार्यक्रमात असते, नेमके कसे म्हटले जाते वगैरे संदर्भांबद्दल काहीच कल्पना नाही, पण...
'एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत' ऐवजी 'एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात' असे म्हटले तर चालू शकेल काय? म्हणजे आज्ञार्थी आहे की विध्यर्थी असा संशयाचा फायदा मिळू शकेल...
किंवा 'कृपया एकदा जोरदार टाळ्या व्हाव्यात' असे पुस्तकी / सरकारी केले तर संशयालाही जागा उरणार नाही.
म्हणजे मुळात हा प्रश्न खालच्या थराचा आहे की चुकीच्या मराठीचा? (अर्थात पल्लवी जोशींकडून चुकीची मराठीही अपेक्षित नसावी म्हणा, पण तो मुद्दा वेगळा.)