मी हा कार्यक्रम पाहिलेला नाही, त्यामुळे नेमके सांगणे कठीण आहे; पण "टाळ्या झाल्या पाहिजेत" .... हे वाक्य आज्ञार्थी कसे? मला ते विधानार्थी वाटते. "(मला ... किंवा आपल्या सर्वांना ... ) टाळ्या वाजवलेल्या ... अशा हव्या आहेत .... माझी किंवा आपली सर्वांची तशी (झाल्या'च' असेल तर अनिवार) इच्छा आहे" ... असे ते विधानार्थी वाक्य होईल असे मला वाटते.
"सर्वजण, टाळ्या वाजवा." - असे म्हटले तर आज्ञार्थ आणि "सर्वांनी टाळ्या वाजवाव्या." असे म्हटले तर विध्यर्थ होईल असे वाटते.
चू. भू. द्या. घ्या.