मुल्लाजींचा आक्षेप नक्की काय हे नीटसे समजले नाही. 'एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत' हे वाक्य तितकेसे योग्य नाही हे मान्य. पण त्याच्यात "प्रसिद्धीसाठी एवढ्या खालच्या थराला जाणे" असे काही वाटत नाही.
मराठी कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाबद्दल बोलायचे तर "स्पर्धकांना निरूत्तर करणे हेच आमचे परमध्येय" असे मानणाऱ्या आदेश बांदेकरी निवेदनापेक्षा पल्लवीची निवेदनशैली कितीतरी पटीने सुसह्य वाटते.