हे वाक्य सा रे ग म प लिटल चँम्प मध्ये असते... पल्लवी जोशी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात (खरं सांगायचं तर काहीही गरज नसताना ! )

मुळात प्रश्न असा आहे कि टाळ्या वाजवा असं सांगावं कशाला लागतं ? प्रेक्षकांना तुम्ही !****! समजता का ? ते सुजाण आहेत, त्यांना गाणं आवडलं तर ते वाजवतील टाळ्या ! या कार्यक्रमात काही गाणी कधी कधी फार सुमार दर्जाची झालेली मी पाहीली आहेत आणि त्या गाण्यांना देखील केवळ 'एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत' या वाक्या मुळे टाळ्यांची दाद मिळालेली मी पाहीली आहे....!

चांगल्या गाण्यांबरोबरच सुमार दर्जाची गाणी देखील खपवायची ! याच गोष्टीला माझा विरोध आहे ......