एकदा माझ्या मित्राला मी शास्त्री रस्त्यावरील बॅरिस्टर नाथ पै चौक हा पत्ता सांगितला तर त्याने मलाच वेड्यात काढले व सरळ-सरळ दांडेकर पूल सांग की असे म्हणाला.

आपल्या देशात पत्ता लिहिण्याचे व वाचण्याचे परिमाण कधीच ठळकपणे दिसले नाही. अमेरिकेत तर फारच स्पष्ट व सुटसुटीत (संक्षिप्त असेही म्हणता येईल) परिमाण ठरलेले आहे.

४ अंकी प्लॉट क्र. रस्त्याचे नाव घर क्र. शहराचे नाव, राज्याचे २ अक्षरी लघुरूप ५ अंकी पिनकोड-[४ अंकी ऊप पिनकोड]

शेवटचे ऊप पिनकोड हे ऐच्छिक आहे. अल्पविराम देखील केवळ एकदाच शहराच्या नावानंतर व राज्याच्या लघुरूपा अगोदर.

एवढा पता एकदा जी पी एस या यंत्रात टाकला की आपल्या सध्याच्या ठिकाणावरून तिथवरचा पूर्ण दिशादर्षक नकाशा बघायला मिळतो.

अन रस्त्यांच्या नावात सुद्धा दिशेचे नाव असेल तर ते एक अक्षर पुरेसे असते. तसेच स्ट्रीट, रोड, ऍव्हेन्यु, ड्राईव्ह, बूलेव्हार्ड, कोर्ट यांचीही लघुरूपे वापरली जातात.

उदा.

३१३६ S. Main St Apt # 6 Santa Ana, CA ९२७०७-४२१९

हा पत्ता आपण गूगल मॅप्स वर टाकून बघावा. समजा लॉस एंजिलिस येथील आंतररष्ट्रीय विमानतळाहून वरील स्थळी पोचायचे असेल तर Get Directions वर क्लिक करावे. A समोर केवळ LAX (या विमानतळाचे सांकेतिक नाव) टाईप करावे B समोर वरील पत्ता टाईप करावा, व Get directions या बटनवर क्लिक करावे. संपूर्ण मार्गक्रमणाशिवाय अंतर व लागणारा अवधी हेही दिसेल.

ता. क. हीच सुविधा थोड्या प्रमाणात भारतातही सुरू झालेली आहे. लौकरच आपणही तिचा लाभ घेवू शकू.