रंगा यांच्याशी सहमत....!
पण याला मुख्य कारण म्हणजे शास्त्रिय पद्धतीने केलेली नगररचना होय. फक्त अमेरिकेतच नव्हे तर सर्व युरोपिअन देशात आणि युरोपिअन कॉलोनीमध्ये पण ह्या प्रकारची नगररचना आहे. संपुर्ण शहराची अनेक ब्लॉक्स मधे विभागणी केली जाते. त्यात समांतर मुख्यरस्ते आणि त्याला साधारणपणे २०० ते ३०० फुटांवर छेदणारे छेदरस्ते यांचे जाळे तयार केले जाते. आणि मग या रस्त्यांच्या दोन्ही बाजुस प्लॉट पाडले जातात. या प्लॉट्सना सलग क्रमांक दिले जातात. त्यामुळेच फक्त प्लॉट क्र. रस्त्याचे नाव आणि शहराचे नाव हा पत्ता शोधणार्याला पुरेसा होतो. कारण त्या शहरात त्या नावाचा एकच रस्ता असतो आणि त्या रस्त्यावर त्या क्र. चा एकच प्लॉट असतो. तो हि क्रमाने.
ब्रिटीशकाळात भारतामध्ये जितकी नगरे वसवली गेली किंवा वाढवली गेली, तिथेही आपल्याला ह्याच प्रकारे घर क्रमांक आणि भागाची नावे दिसून येतात. पण नंतरच्या काळात शहरांची वाढ इतकी बेसुमार आणि बेलगाम झाली कि शास्त्रिय नगररचना कुठच्या कुठे गायब झाली.
त्यामुळे आजच्या काळात तरी (जो पर्यंत पुन्हा सर्व शहरांची शास्त्रिय रचना होत नाही तो पर्यंत) जीपीएस प्रणाली भारतात पुर्णपणे वापरात येउ शकत नाही. एका शहरापासून दुसर्या शहरापर्यंत जाण्यासाठी याचा उपयोग होउ शकतो.