श्री. मैफल यांनी समर्पक माहिती दिली आहे. बहुधा चंदिगढ हे शहर याबाबतीत आदर्श ठरेल.
शुद्ध मराठी - आपण जर या रस्त्यांवरून गेला असता तर, ही दोन्हीही नावे परिचयाची व्हायला हरकत नाही.
शास्त्री रस्ता - माजी पंतप्रधान श्री. लालबहादूर शास्त्री यांच्या नावावरून आहे. तो अलका सिनेग्रुहापासून सुरू होवून सिंहगड रस्त्याला मिळतो. दांडेकर पुलाअगोदर सारसबागेशेजारून येणारा रस्ता त्याला जेथे मिळतो तेथे रस्त्याच्या मधोमध एक मोठा वृक्ष आहे. तिथे बॅ. नाथ पै चौक अशी पाटी आहे. थोडाच पलीकडे दांडेकर पूल आहे.