भारतामध्ये दुसऱ्याला कळेल असा पत्ता सांगण्यासाठी ज्याला पत्ता सांगत आहोत त्याच्या दृष्टिकोनातून बघणे आवश्यक आहे असे वाटते. ह्यालाच मॅनेजमेंट मध्ये इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात. प्रत्येक माणसाच्या विचारांच्या कक्षा असतात. त्यालाच लॉजिक बबल अशी एक संज्ञा आहे. दुसऱ्याच्या लॉजिक बबल मध्ये शिरून जो विचार करेल तो चांगला मॅनेजर होईल आणि चांगला पत्ता देखिल सांगू शकेल.