आचार्य अत्र्यांचे साष्टांग नमस्कार हे नाटक ज्या दिवशी पहिल्यांदा आणि तेही मान्यवर प्रेक्षकांसमोर सादर झाले त्यावेली हशे झाले नाहीत की टाळ्या पडल्या नाहीत.  अत्रे अत्यंत निराश झाले होते. पण निर्मात्याने सांगितले की उद्या अशी जाहिरात करतो की प्रेक्षकांची अलोट गर्दी होईल आणि हशा-टाळ्यांचा पाऊस पडेल.  आणि तसेच झाले.  अजूनही त्या नाटकातली वाक्ये टाळ्या घेतात. त्यामुळे टाळ्या झाल्या पाहिजेत असे म्हणायला काहीच हरकत नाही, उलट प्रेक्षक जर टाळ्या देत नसतील तर त्यांना तशी सूचना करायला काहीही प्रत्यवाय नसावा. अमुक व्यक्तीचे नुकतेच निधन झाले, त्या निधनाच्या नावाने नाही तर व्यक्तीच्या नावाने टाळ्या व्हाव्यात अशी अपेक्षा करायला काय अडचण आहे? हे खरे आहे की, पल्लवी जोशींचे शब्दप्रयोग अनेकदा चुकतात.  उदाहरणार्थ त्या पूर्वी 'लवकर परत येऊ' याऐवजी 'लवकरच( म्हणजे नको तितक्या, अपेक्षेपेक्षा अधिक लवकर) परत येऊ" म्हणत.  अशा चुका होऊ नयेत, पण अनवधानाने होतात.  त्या पुढे त्यांनी सुधारल्या.  पण प्रस्तुत न घडलेल्या चुकीबद्दल त्या खालच्या पातळीवर गेल्या असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे.