अलका टॉकीजवरून पर्वतीकडे जाणाऱ्या रस्त्याला नवी पेठ म्हणतात आणि तेच त्या रस्त्याचे लोकप्रिय नाव आहे.
नवी पेठ हे त्या भागाचे नाव आहे हे आपल्यासारख्या पुणेकरांस सांगणे न लगे. त्या रस्त्याला लालबहाद्दुर शास्त्री रस्ता किंवा शास्त्री रस्ताच म्हणतात. माझ्या जन्मापासून तरी ह्या रस्त्याला नवी पेठ म्हटल्याचे मी ऐकलेले नाही. किंबहुना मी किंवा कुणीही शास्त्री रस्ता असे म्हटल्यावर, म्हणजे कुठे? असे अजून पुण्याबाहेरच्या माणसानेही (पुण्यात स्थायिक झालेला, पुण्याची माहिती असलेला, पण मुळचा पुण्याचा नसलेला) विचारल्याचे स्मरत नाही.
मात्र नाथ पै चौक दांडेकर पूल ह्या नावाने जास्त ओळखला जातो हे मान्य. कँपातला मेन स्ट्रीट एम. जी. रोड ह्या नावानेही ओळखला जातो. आम्ही तरी त्याला एम. जी रोडच म्हणतो. कुमठेकर रस्ता आणि शिवाजी रस्ता हे सुद्धा व्यक्तिनामानेच ओळखले जातात. मात्र त्यांच्या बांधणीचा संस्था, देणगी इ. गोष्टीशी काय संबंध आहे याबाबत अज्ञानी आहे. तसेच आपटे आणि सेनापती बापट रस्ता यांची काय ष्टोरी आहे? तिथे तरी मला अनुक्रमे आपटे आणि सेनापती बापटांच्या नावाची संस्था, पुतळा असे काही पाहिल्याचे स्मरत नाही. जाणकारांनी मदत करावी.
मुद्दा असा की, आपण आपल्या सोयीने नावे ठरवली आहेत. ती निश्चित एकच अशी काही ठरलेली नाहीत. त्यामुळे पत्ता समजावून घेताना आपण त्या भागाला एक आणि दुसरा दुसरे म्हणत असेल तर गोंधळ होऊ शकतो. असो. कटककरांचा मुद्दा अजूनच वेगळा आहे आणि त्याबाबत दुमत नाही.