शोले सुद्धा पहिले काही दिवस फेल गेला होता पण नंतर तो ५ वर्षे सातत्याने चालला, त्यासाठी पल्लवी जोशी सारख्या कोणत्याही प्रमोटरची गरज पडली नाही. माझा आक्षेप फक्त कार्यक्रमात कृत्रीमता आणू पाहणाऱ्या गोष्टींना आहे. सा रे ग म प मध्ये पूर्वी फक्त गाणं आणि गाणंच असायचं आणि आज गाण्याबरोबरच additional packages देखील खपवली जातात. काय तर रोहीतचा घसा बसला होता तरी तो गाणं म्हणाला, यागोष्टीवर रोहीतला गूण मिळवून देण्यासाठी पल्लवी आटापीटा करणार ! माझं म्हणणं एवढच आहे कि गाण्याच्या कर्यक्रमात फक्त शुद्ध गाणं होउ द्या बाकी काहीही नको !
माझ्या भाषेत मी याप्रकाराला "दर्जा शी तडजोड" असं म्हणतो, तुम्ही काय म्हणता?
चु. भू. दे.घे.