आपल्याकडे आणि परदेशात या बाबतीत जाणवणारे काही फरक. (इथे जाज्वल्य देशाभिमान असणाऱ्या मंडळींना राग येण्याची शक्यता आहे. तिकडे बसून आपल्या देशाला नावे ठेवायला काय जातय? इथे येऊन ग्रासरूट लेव्हलला काहीतरी करून दाखवा. इ. )
परदेशात प्रत्येक गावाचा नकाशा बऱ्याच ठिकाणी उपलब्ध असतो. त्यात प्रत्येक रस्त्याला नावे असतात. प्रत्यक्ष रस्त्यावरही नावांच्या दिसेल अशा पाट्या असतात. त्यामुळे नकाशा असेल तर चुकण्याची शक्यता फारच कमी.
पुण्याचा नकाशा छापील स्वरूपात बघण्याचा योग आलेला नाही. तो अस्तित्वात आहे का याबद्दल शंका आहे. सदाशिव, शनिवार इ. पेठा नेमक्या कुठे सुरू होतात आणि कुठे संपतात हा पीएचडी करण्याजोगा प्रश्न आहे. कुणाचेतरी किचन एका पेठेत आणि बाकी घर दुसऱ्या पेठेत असल्याची अफवा किंवा बातमीही ऐकली होती.
पत्ता देणारे तर फारच महान. अमुक ठिकाणी कुणालाही विचारा यावर पुलंनीही लिहीले आहे.
हॅम्लेट