७ वर्षांपूर्वी माझा एक मित्र जो महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात स्थायिक झाला होता. एक दिवस पेठांतील बोळींमध्ये हरवला. त्याला वाटले बाजीराव रस्त्याला लागल्यास परत इच्छित स्थळी जाणे शक्य होईल. म्हणून एका (वृद्ध) ज्येष्ठ नागरिकास विचारले. आजोबा बाजीराव रस्ता कुठे आहे?
आजोबांनी त्यास आपादमस्तक न्याहाळले व विचारले, किती वर्षांपासून पुण्यात आहेस? मित्र म्हणाला २.
यावर आजोबा एवढे चिडले, म्हणाले मूर्खा तू ज्या रस्त्यावर उभा आहेस तोच बाजीराव रस्ता.
पुढील काही महिने तो पेठांतील रस्त्यांकडे (एकट्याने) फिरकलाही नाही हे सांगणे न लगे ;-).