पुण्यात पूर्वी प्रत्येक रस्त्याच्या/बोळाच्या/गल्लीच्या दोन्ही टोकांना त्या त्या रस्त्यावर कोठले घरक्रमांक आहेत त्याची माहिती देणारे फलक खांबांवर लावलेले होते. त्यात एका टोकाला जर १२०० शुक्रवार ते १२१० शुक्रवार असे लिहिलेले असेल तर दुसऱ्या टोकाला १२१० शुक्रवार ते १२०० शुक्रवार असे योग्य दिशेला बाण करून बिनचूक लिहिलेले असे.