हे शास्त्रीबुवा कोण

लाल बहादुर शास्त्री. माझ्या आठवणीप्रमाणे लोकमान्य नगराच्या टोकाकडे ह्या रस्त्यावर शास्त्रींचा पुतळाही आहे.

अजूनही पुण्याचा परिपूर्ण रोडमॅप बाजारात उपलब्ध नाही

पूर्वी पुणे ए टू झेड असे एक पुस्तक होते. त्यात संपूर्ण शहराचा नकाशा भाग करून निरनिराळ्या पानांवर दिलेला होता. नकाशे अतिशय बारकाईने दिलेले होते. छोट्या छोट्या गल्लीबोळांचे उल्लेखही बिनचूक होते. मध्यवर्ती भागातले नकाशे त्यातही अधिक बारकाईने दिलेले होते. महत्त्वाची स्थळे सांगणारी चांगली सूचीही होती. परदेशात मिळणाऱ्या अशा एखाद्या पुस्तकासारखेच हे पुस्तक अतिशय उपयुक्त होते.